पंतप्रधानांविषयीचे वक्तव्य भोवले; पटोलें विरोधात गुन्हा दाखल I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

पंतप्रधानांविषयी अफवा पसरवनाऱ्या पटोले यांना अटक करा - अतुल भातखळकर

पंतप्रधानांविषयीचे वक्तव्य भोवले; पटोलें विरोधात गुन्हा दाखल

मालाड - लोकसभेत पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर केलेल्या टीकेमुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले. दरम्यान, राज्यभरातील कॉंग्रेस नेते आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी माफी मागावी अशी मागणी केली. यासंदर्भात राज्यभर आंदोलनही झाले. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता भाजपा नेत्यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, आता पटोले यांच्या विरोधात आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोध केलेल्या वक्तव्याचा विरोध करत कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज भातखळकर यांनी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांसमावेत पोलिस ठाण्यात प्रवेश केला. पटोलेंवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार त्यांनी केली आहे. पाटोलेंनी काढलेल्या मोर्चात 18 वर्षाखाली मुलांनाही सहभागी करून घेतले होते. या मुलांना पंतप्रधानांविषयी भडकविण्याचे काम पटोले करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. पंतप्रधानांविषयी अफवा पसरवनाऱ्या पटोले यांना अटक करा, असेही भातखाळकर म्हणाले आहेत.

Web Title: Mla Bhatkhalkar Filed Case Against Nana Patole In Mumbai Statement Of Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top