आमदार दत्तात्रय सावंत म्हणतात; शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात विनाअनुदानचा अडथळा 

संतोष सिरसट 
Sunday, 19 July 2020

अनेक शिक्षकांनी केल्या आत्महत्या 
विनाअनुदानित धोरणामुळे अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. अनुदान मिळण्याच्या प्रक्रीयेतील अटी शिथिल करण्याची आवश्‍यकता आहे. अंशतः अनुदान प्राप्त शाळांनी दरवर्षी पुढील वाढीव टप्पा मिळणे अपेक्षित असताना तसे होत नाही. शिक्षकांच्या कॅशलेस मेडीकल योजनेचा प्रश्‍न अंतिम टप्यात असून तो लवकरच मार्गी लागेल. जुन्या पेंन्शन योजनेसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्यव्यापी लढा देण्याची आवश्‍यकता आहे. 
दत्तात्रय सावंत, आमदार. 

सोलापूर ः शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. या शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात विनाअनुदानाचे धोरण मात्र अडथळा ठरत असल्याचे मत आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यांनी दिली. 

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या राष्ट्रव्यापी ऑनलाईन शिक्षण परिषदेत ते बोलत होते. शिक्षकांच्या समस्या व उपाय या विषयावर आमदार सावंत बोलत होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पु पाटील-भोयर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वर्ष ज्ञानार्जन करुनही त्यांचा वेतनाचा प्रश्‍न सुटत नाही असेही आमदार सावंत यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास रेडे, राजकिरण चव्हाण, हणमंत भोसले, अनिल गायकवाड, दीपक डांगे, संजय निंबाळकर, शांताराम जळते, विशाल पवार, प्रकाश बाळगे, संतोष रजपुत, हणमंत पवार यांनी प्रयत्न केले. या ऑनलाईन शिक्षण परिषदेत राज्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Dattatraya Sawant says; Unsubsidized barriers to universalization of education