Guwahati Press I ईडी नव्हे प्रेमाच्या कमतरतेमुळे आम्ही शिंदेंसोबत : केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईडी नव्हे प्रेमाच्या कमतरतेमुळे आम्ही शिंदेंसोबत : केसरकर

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही, शिवसेनेचाच एक भाग आहोत - केसरकर

ईडी नव्हे प्रेमाच्या कमतरतेमुळे आम्ही शिंदेंसोबत : केसरकर

मागील पाच दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंडखोरी पुकारल्यामुळे हे वातावरण दिवसेंदिवस आणखी तापत आहे. दरम्यान, अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला तर अधिवेशनाची मागणी करू, अशी असे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ईडी नव्हे प्रेमाच्या कमतरतेमुळे आम्ही शिंदेसोबत असल्याचे सकाळ डिजीटलच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. आम्ही शिवसेनेचाच एक भाग आहोत. पण आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत. भाजपसोबत राहण्यातचं राज्याच हित आहे. खासदार राऊतांचे बोलणे गांभिर्याने घेत नाही, असंही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला

पुढे ते म्हणाले, कोणतीही गोष्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगितली की ते विचार करायचे. राज्यात ईडीची कारवाई एका दोन नेत्यांवर झाली आहे. सर्व नेत्यांवर नाही, त्यामुळे ईडीच्या भितीने आम्ही भाजपाची साथ देत आहोत ही माहिती चुकीची आहे. याआधीही आम्ही मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जाण्यासाठी सांगितलं होतं. मात्र आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात नाही. शिवसेनेमुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सत्तेत आहेत आणि त्यांच्याकडे सगळी चांगली खाती आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्याविषयी अविश्वासाचा ठराव करण्यात आला होता, तो फेटाळण्यात आला आहे. या आमदारांची मुख्य नाराजी ही राष्ट्रवादीवरती आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आमची मदत करत नव्हते, असं वक्तव्य केसरकर यांनी केल आहे. शिवसेनेनं भाजपसोबत जावं अशी आमची मागणी आहे. आमच्याच पक्षात आमच्या आमदारांना भेटीगाठी होत नव्हत्या त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्षप्रमुखांनी या निर्णयाचा सहानुभूतीपूर्वी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: "मी मुख्यमंत्रीपद उपभोगलंच नाही"-CM ठाकरे

Web Title: Mla Deepak Kesarkar Criticized To Shiv Sena No Ed Fear With Eknath Shinde Guwahati Press

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top