
‘विकास तेव्हाच होईल जेव्हा राज्य व केंद्र दोन्ही एकत्र असतील’
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जे काही सांगायचे होते ते सांगितले. आता विलंब करण्याची वेळ नाही. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, पण तुम्ही भाजपसोबत जावे, असे लोकांना वाटते. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडून भाजपशी हातमिळवणी करावी, असे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. (MLA Deepak Kesarkar said, we are not angry with the Chief Minister)
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसणारे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर गुरुवारी सकाळी गुवाहाटीला पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी तीन आमदार पोहोचले आहेत. दीपक केसरकर यांनीही युतीतील मंत्रिपदाच्या वाटपावर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेकडे एकही महत्त्वाचे खाते नाही. फक्त शहरी विकास आणि उद्योग आहेत. ग्रामीण महाराष्ट्राशी संबंधित मंत्रिपद एकतर राष्ट्रवादीकडे आहे किंवा काँग्रेसकडे आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.
हेही वाचा: औरंगाबादमध्ये लागले बॅनर; हे माऊली... मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे
आम्ही अनेकदा स्पष्ट केले होते आणि नैसर्गिक युतीसोबत जावे ही माझी मागणी होती. भाजप-शिवसेना २५ वर्षे एकत्र होते. आम्ही एकत्र निवडणुका लढल्याचे लोकांनी पाहिले. राज्याच्या भल्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय दिला आहे. मी राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला नाही, असेही दीपक केसरकर म्हणाले.
राज्याच्या विकासासाठी युती तोडून भाजपसोबत जावे. जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा चांगले काम झाले होते. आता विकासाची वेळ आली आहे. विकास तेव्हा होईल जेव्हा राज्य आणि केंद्र दोन्ही एकत्र असतील, असेही दीपक केसरकर म्हणाले.
हेही वाचा: द्रोपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार करून भाजपला किती फायदा?
आमच्याकडे असलेल्या आकडेवारीची माहिती एकनाथ शिंदे देतील. कालपर्यंत शिवसेनेचे विजयी झालेले ३७ आमदार येथे उपस्थित होते. मी विमानात असताना माझ्यासोबत शिवसेनेचे तीन आमदार होते. तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारा एक अपक्ष आमदार होता. त्यामुळे हा आकडा वाढला. यासोबतच दोन-तीन लोक प्रवास करीत आहेत, ते केव्हाही पोहोचू शकतात, असेही दीपक केसरकर म्हणाले.
Web Title: Mla Deepak Kesarkar Said We Are Not Angry With The Chief Minister
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..