Old Pension Scheme : विधान परिषदेतल्या आमदाराने नाकारली पेन्शन; सभापतींना धाडलं पत्र

employee strike for old pension scheme employee angry nandurbar news
employee strike for old pension scheme employee angry nandurbar newsesakal

मुंबईः मागील काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. आठवडा लोटत आला तरी अद्याप कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघालेला नाही.

विधान परिषदेतले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषद सभापतींना पत्र लिहून पेन्शन नाकारत असल्याचं म्हटलं आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नसल्याने आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या मोहीमेमध्ये सहभागी होत त्यांना पेन्शन घेण्यास नकार दिलेला आहे.

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पेन्शन नाकारली आहे. शिक्षकांनी जुनी पेन्शन मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

employee strike for old pension scheme employee angry nandurbar news
Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, कोठडीत १४ दिवसांची वाढ!

दरम्यान, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत नाराजी दिसून येत आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. १९ लाख सरकारी कर्मचारी सध्या संपावर गेल्याने सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपकऱ्यांसोबत आज बैठक सुरु आहे. त्यामधून तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची १६ जणांच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुरु झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com