esakal | विकासाला विरोध नाही पण भूमिपुत्रांवर अन्याय नको - आमदार जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

विकासाला विरोध नाही पण भूमिपुत्रांवर अन्याय नको - आमदार जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खालापूर : शेतकरी आणि कामगारांचा पक्ष (SKP) असलेला शेकाप शेतकरी आणि कामगारांवर कदापि अन्याय होऊन (Justice to farmers) देणार नाही त्यामुळे विकास होत असताना भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी रोखठोक भूमिका शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील (Jayant patil) यांनी मांडली. दहागांव शेतकरी संघर्ष समितीची बैठक खरीवली येथील बहरीनाथ मंदीरात रविवारी आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील छत्तिशी भाग म्हणून ओळखला जाणारा खरीवली, गोठीवली, नंदनपाडा या भागात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) जागा संपादन करणार आहे.

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

दहागाव शेतकरी संघर्ष समितीचा विरोध नसून कारखाने उभारताना कोणकोणत्या उत्पादनाचे कारखाने येणार आहेत याची माहिती देत स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध करावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिल्यास प्रकल्पाला विरोध होणार नाही असे मत जयंत पाटील यांनी मांडले.शेतकरी बांधव सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत दहागांव शेतकरी संघर्ष समितीला एकमुखाने पांठिंबा देत केलंल आंदोलन असेल त्यामुळेच आज पंचवीस टक्के भाव वाढवून देण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्यशासनाने घेतली आहे.

एखाद्या कारखान्याला पाणी मिळते,रस्ते होतात मात्र गावं तशीच राहतात.त्यामुळे येथील पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत याची लेखी हमी देत तसा कायदा विधीमंडळात बनवला पाहिजे अशी भूमिका असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. शेकापक्षाचे जिल्हासह चिटणीस किशोर पाटील,संतोष जंगम, तालुका चिटणीस संदीप पाटील,पं.स.सदस्य उत्तम परबळकर,मनोहर शिंदे,दहागांव शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शांताराम पाटील, अशोक पाटील, मिलिंद दाभोलकर, जनार्दन खरिवले, राजू पाटील, परशुराम पाटील, सुरेश पाटील,ग्रामस्थ मिलेश पाटील,किरण पाटील,परशुराम पाटील(गोठवली),सुरेश पाटील, कुडंलीक पाटील, विष्णु पाटील यांच्यासह महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार जयंतभाई यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी झाले असून पुढील मागण्याही त्यांच्याच माध्यमातून पूर्ण होतील असा विश्वास शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना अशोक पाटील यांनी प्रास्ताविक करताना व्यक्त केले.

loading image
go to top