esakal | पवार साहेबांनी अजून काय करायला हवे, असे म्हणतच जितेंद्र आव्हाडांचे डोळे पाणावले...
sakal

बोलून बातमी शोधा

jentendra.jpg

दादांनी झालेल्या चुका सुधराव्यात. कुठलाही बाप आपल्या मुलाचे कितीही चुकले तरी त्याच्या चुकांना माफ करतोच ना. राजकारण बाजूला राहू द्यावे. रक्ताचं नातं खुप महत्वाचं आहे. असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

पवार साहेबांनी अजून काय करायला हवे, असे म्हणतच जितेंद्र आव्हाडांचे डोळे पाणावले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शरद पवार साहेबांना कार्यकर्ते खुप महत्वाचे आहेत. ते आजही आपल्या मुलाप्रामाणे आपल्या कार्यकर्त्यांना जीव लावतात. हे मी स्वतः अनुभवले आहे. माझं साहेबांशी असलेलं नातं हे बाप व पोराचं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांविषयी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांचे डोळे पाणावले. सध्याच्या राजकीय स्थितीविषयी 'साम'च्या  बातमीदाराने त्यांच्याशी संवाद साधला. 

सध्या अजित पवार यांनी केलेल्या बंडाविषयी बोलताना ते म्हणाले, ''शेवटी आम्ही दरवाजाच्या बाहेर बसणारी माणसं आहोत, शेवटी त्यांचं रक्ताचं नातं आहे. साहेब व प्रतिभा काकींनीं दादांना खूप जीव लावला आहे. सांभाळलं आहे. दादांनी झालेल्या चुका सुधराव्यात. कुठलाही बाप आपल्या मुलाचे कितीही चुकले तरी त्याच्या चुकांना माफ करतोच ना. राजकारण बाजूला राहू द्यावे. रक्ताचं  नातं खुप महत्वाचं आहे.'' 

आव्हाड पुढे म्हणाले, या वयात पवार साहेबांनी आराम करावयास हवा, पण ते राज्य़ातील जनतेसाठी व आमच्यासाठी या वयातही काय काय करत आहेत. अजून साहेबांनी आमच्यासाठी काय काय करायला हवे असा सावाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते.
कार्यकर्ता हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आम्ही साहेबांची पोरं आहेत. पोरं सगळ्या गोष्टी बापालाचा सांगतात ना.
पोरगं चुकलं तर बापच साभाळून घेताे ना.

सगळेच संजय राऊत होऊ शकत नाहीत असा टोला त्यांनी आशिष शेलार यांना हाणला. 50 आमदार आमच्या बरोबर असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

loading image