Ajit Pawar : मोहीम फत्ते! अजित पवारांच्या खास विश्वासू माणसाने गायब झालेल्या 'त्या' आमदाराला रात्रीतूनच उचललं

ajit pawar ncp
ajit pawar ncpesakal
Updated on

मुंबईः अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर ९ आमदारांनी शपथ घेतली. पवार गटाकडून सुरुवातील अजित पवारांसोबत केवळ ९ आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु बैठकीच्या दिवशी पवारांसोबत ३५च्या जवळपास आमदार असल्याचं स्पष्ट झालं. आणखी आमदार आपल्या गटाकडे येत असल्याचंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं होतं.

आता गोष्ट आहे एका करामती आमदाराची. जे शपथविधीसाठी अजित पवार गटामध्ये होते. त्यानंतर बैठकीच्या दिवशी त्यांनी शरद पवारांच्या वायबी सेंटरमधील बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर ते गायब झाले. शेवटी अजित पवारांनी त्यांच्या मागावर काही लोक पाठवले आणि त्यांना आपल्या गटात आणलं.

ही गोष्ट आहे अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची. अजित पवारांचा शपथविधी झाला त्यावेळी ते राजभवनामध्ये उपस्थित होते. त्यांनी त्यांनी वाय.बी. सेंटरमध्ये शरद पवारांच्या बैठकीला हजेरी लावून पवारांना समर्थन जाहीर केलं होतं. परंतु अजित पवारांनी टाईट फिल्डिंग लावून लहामटेंना पुन्हा माघारी आणलं आहे.

ajit pawar ncp
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना बंजारा समाजाकडून 'धर्माभिमानी' पदवी; पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात

त्यांना परत आणण्यासाठी अजित पवारांनी नगर जिल्ह्यातील खास विश्वासू सहकारी बाळासाहेब जगताप यांना अकोल्याला पाठवले होतं. बाळासाहेब जगताप यांनी अकोल्यात तीन दिवस तळ ठोकून मोहीम फत्ते केली.

जगताप यांनी डॉ. लहामटे यांची वेळोवेळी समजूत काढली मात्र ते तयार होत नव्हते. अनेक माध्यमातून त्यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले, मात्र लहामटे त्यांना टाळत होते, घरीही थांबत नव्हते. अज्ञात ठिकाणी जावून थांबायचे.

ajit pawar ncp
PSI Success Story : अभ्यासातील सातत्याने गाठले यशाचे शिखर! अथक परिश्रमाने रविकांतची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

मात्र शनिवारी रात्री काम फत्ते झालं. आमदार लहामटे यांना सोबत घेऊन रात्रीतूनच तातडीने मुंबईला नेण्यात आलं तिथे कागदपत्रावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. मतदारसंघातील विकासकामांचा आराखडा त्यांना तयार करण्यास सांगितलं. अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर आता अधिकृतरित्या किरण लहामटे अजित पवारांच्या पक्षाचे झाले आहेत.

कोण आहेत किरण लहामटे?

मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादीने किरण लहामटे यांना ताकद दिली. डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या पुत्राचा पराभव करत राज्यभर चर्चा घडवून आणली होती. नंतर अकोल्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची ३० वर्षांची सत्ताही त्यांनी संपुष्टात आणली. अजित पवार गटामध्ये सहभागी झाल्यानंतर तेथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com