Nilesh Lanke: अजित पवारांना मोठा धक्का! निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा, 'या' दिग्गजाच्या विरोधात लढणार

Nilesh Lanke: अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निलेश लंके आता भाजप उमेदावर सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात लढणार हे स्पष्ट झालं आहे.
Nilesh Lanke
Nilesh Lankeesakal
Updated on

Nilesh Lanke: लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आमदारीचा राजीनामा दिला आहे. दक्षिण नगरमधून भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात निलेश लंके निवडणूल लढवणार आहेत. निलेश लंके शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.  

नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी खासदारकी लढवण्याची घोषणा केली तेव्हापासून अजित पवार लंकेंवर नाराज आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तेव्हापासून अहमदनगरची जागा खूप चर्चेत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात लढत होणार आहे.

Nilesh Lanke
VBA and Shiv Sena: वंचितसोबत नेमकी काय चर्चा झाली? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंके यांच्या पत्नीही सक्रिय दिसत आहेत.

राजीनामा देताना निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला लोकसभा लढवायची असेल तर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे लंके म्हणाले. यावेळी त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ते म्हणाले आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे. मी विधावसभा अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा पाठवत आहे. 

Nilesh Lanke
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला कुठे कुठे थेट भिडणार ठाकरे-शिंदेंचे शिलेदार; कोण आहे लोकांची पहिली पसंती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

He said he would raise the students' issues related to examinations and recruitment in Parliament.
First full size statue of Ajit Pawar in Baramati
NILESH SABLE
MP Nilesh Lanke Orders Quality Road Construction as Per Sanctioned DPR
Marathi News Esakal
www.esakal.com