esakal | SECC Data : 'फडणवीसांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल'
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan-Devendra Fadnavis

एसईसीसी ९९ टक्के डेटा त्रुटीरहित विरोधी पक्षनेत्यांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

SECC Data : 'फडणवीसांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल'

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : एसईसीसी ९९ टक्के डेटा त्रुटीरहित विरोधी पक्षनेत्यांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी केली आहे. विधानसभेत ५ जुलै २०२१ रोजी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यात २०११ साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत (SECC Census) ८ कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात ६९ लाख चुका आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) अबाधित राहण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एसईसीसी डेटा राज्य सरकारला पुरवला पाहिजे, असा ठराव महाराष्ट्र शासनातर्फे आणला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी हे चुकीचे वक्तव्य करून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. (MLA Prithviraj Chavan Criticizes Devendra Fadnavis Over SECC Census Political News)

याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती आणि आकडेवारी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने (Union Ministry of Rural Development) संसदेतील स्टँडिंग कमिटी (Standing Committee) समोर मांडलेल्या २७ व्या अहवालात सुस्पष्ट दिलेली आहे. २०१० साली युपीए सरकारने जातनिहाय आणि आर्थिक जनगणना (एसईसीसी) करण्याचे ठरवले. त्यानुसार २९ जून २०११ रोजी काम सुरू झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत (Union Ministry of Home Affairs) असलेले रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (Registrar General of India), केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि केंद्रीय शहरी आवास मंत्रालय या तीन मंत्रालयांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या जनगणनेचे काम २०१६ साली पूर्ण झाले.

हेही वाचा: ED विषयी राष्ट्रवादी, भाजपच्या प्रमुख नेत्यांना विचारा

या अहवालातील पान क्र. १० वरील माहितीनुसार, रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, एसईसीसीच्या जनगणनेतील सर्व माहितीचे विश्लेषण झाले आहे आणि ९८.८७% व्यक्तींच्या डेटामध्ये कोणतीही त्रुटी नाही. याच अहवालात पुढे नमूद केले आहे, की एसईसीसीमध्ये एकूण लोकसंख्या ११८,६४,०३,७७० एवढी नोंदवली आहे. त्यापैकी १,३४,७७,०३० एवढ्या नोंदीमध्ये काही चुका आढळल्या आहेत. संपूर्ण देशासाठी हे प्रमाण फक्त १.१३% आहे. सदर चुका दुरुस्त करण्यासाठी सीओटीएस अशी स्वतंत्र प्रक्रियाही अनेक राज्यात राबवली गेली. या प्रक्रियेंतर्गत उत्तर प्रदेशातील दोन लाख नऊ हजार १८२ तर राजस्थानातील ४५ हजार ५५० चुका दुरुस्त केल्या आहेत. दुर्दैवाने विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी एसईसीसी जनगणनेतील चुकांचा आकडा फुगवून सांगितला आणि सभागृहातील ओबीसी आरक्षण अशा अत्यंत महत्वाच्या विषयावरील चर्चा भरकटवली.

MLA Prithviraj Chavan Criticizes Devendra Fadnavis Over SECC Census Political News

loading image