Shivsena : आमदार राजू पारवेंचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश; रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी निश्चित?

CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
cm eknath shinde
cm eknath shindeesakal

CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी साथ देणारे खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट झाला आहे. काँग्रेसच्या रश्मी बर्वे व पारवे यांच्यात सामना होणार आहे.

रविवारी मुंबईत त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून पारवे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीची सत्ता आली. सरकारकडून अनेक कामांवर स्थगिती देण्यात आली होती. परंतु पारवे यांच्या मतदार संघातील कामांना मंजुरी मिळाली होती.

cm eknath shinde
Shirur Loksabha 2024 : शिरुरमध्ये आढळराव 'अढळ' ठरतील? की कोल्हेंचं 'मोल' 'अमोल' ठरेल? मतदारसंघाचा इतिहास जाणून घ्या...

तेव्हापासून पारवे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. रामटेक लोकसभेची उमेदवारी त्यांना हवी होती. परंतु ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित नव्हता. रामटेकच्या जागेसाठी शिंदे आग्रही होते. अखेर रामटेकची जागा शिंदेंकडे आली. त्यामुळे पारवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलल्या जात आहे.

भाजपचा खासदार तुमाने यांना आधीपासूनच विरोध होता. त्यांचा सर्वे नकारात्मक आहे आणि ते पराभूत होतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. यातून तोडगा काढण्यासाठी राजू पारवे यांना शिवसेनेत पाठवण्यात आल्याचे समजते. रविवारी मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर पारवे यांनी धनुष्यबाण हाती घेलता.

विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा पाठवला. पारवे वर्षभरापासून भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्या सोबत ते भाजप प्रवेश करणार होते. मात्र रामटेकचा निर्णय होत नसल्याने ते थांबले होते. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम दिला.

cm eknath shinde
Bachchu Kadu : बच्चू कडूंचं ठरलं! राणांविरोधात भाजपमधून आयात केलेला उमेदवार देणार

काँग्रेसचं संख्याबळ झालं कमी

पारवे शिवसेनेत गेल्याने काँग्रेसचं संख्याबळ एकने कमी झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांपैकी चार जागा काँग्रेसकडे होत्या. पारवेंच्या शिवसेना प्रवेशाने ही संख्या आता तीनवर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com