
सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला AU या नावानं एकूण 44 फोन आले होते - खासदार राहुल शेवाळे
Rohit Pawar News : खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) कधीच संसदेत बोलत नाहीत. काल बोलून-बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका (Mumbai Election) डोळ्यापुढं ठेवून आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) आरोप केले आहेत. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करूनच असे खोटे आरोप होताहेत, असा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलाय.
भाजपचे (BJP) नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या आत्महत्येचं राजकारण करण्यात आलं. गुजरात निवडणुका आल्या, तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्यात आले. कर्नाटक निवडणुका येताच सीमावाद तापविण्यात येत आहे. तसाच प्रकार 'एयू'बाबत आहे, असंही पवार यांनी सांगितलं.
रोहित पवार पुढं म्हणाले, कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की बोलू दिलं जात नाही. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीत. सध्या मोघम बोलून विषय टाळण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव जोडल्यानं हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला AU या नावानं एकूण 44 फोन आले होते, अशी माहिती देतानाच हा AU म्हणजे अनन्या उधास किंवा आदित्य-उद्धव (आदित्य उद्धव ठाकरे) असं असावं, असं खासदार राहुल शेवाळेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय. AU बाबतची ही माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचं शेवाळेंनी सांगितलं. AU कोण याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही शेवाळेंनी केलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.