मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष

Rohit Pawar MIDC Jacket:MIDCच्या मागणीसाठी रोहित पवारांनी लढवली अनोखी शक्कल, उद्योगमंत्री उदय सामंत जॅकेट बघण्यासाठी आले मागे
मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष

Rohit Pawar MIDC:सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांआधी विधानभवनाच्या खाली छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याखाली भर पावसात बसून आंदोलन केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचं आश्वासन दिलं होतं आणि पुढच्या दिवशी अधिवेशनात याची घोषणा करु अशी ग्वाही देखील दिली होती.

मात्र, त्यानंतर सरकारकडून यावर कोणतही पाऊल उचलण्यात आलं नव्हतं. तेव्हापासून आमदार रोहित पवार एमआयडीसीच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे दिसले. आता विधानसभेच्या बाहेर एक जॅकेट परिधान करुन दिसले, ज्यावर मोठ्या अक्षरामध्ये 'एमआयडीसी'प्रिंट केलेलं होतं.

जेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांची नजर त्या जॅकेटवर पडली तेव्हा त्यांनी पुढे चाललेल्या रोहित पवारांचा मागे गेले आणि त्यांना थांबवून या जॅकेटवरील मजकूर वाचला. जेव्हा माध्यमांनी त्यांना या जॅकेटबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, "मला एका मित्राने हे जँकेट दिलं आहे.मागच्या बाजूला जो संदेश दिला आहे तो महत्वाचा आहे.अधिवेशनात मुद्या्चं सोडून भलतच काहीतरी बोलतात. समाजात तेढ निर्माण करणारे लोक आहेत. सरकारचं आणि लोकांच लक्ष विचलित होत आहे. योगायोगाने उदय सामंत भेटले त्यांना जँकेट दाखवले त्यांना आवडलं."

रोहित पवार यांच्या जॅकेटवर पुढच्या बाजूने मोठ्या अक्षरात MIDC असं छापण्यात आलं असून मागच्या बाजूने लिहिलंय की,"ध्येय विकासाचा ठेऊया, वेध भविष्याचा घेऊया. युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्यांच बोलूया." यावेळी त्यांनी मुद्द्याचं बोलूया या गोष्टीवर जास्त भर दिल्याचं दिसून आलं. यापुढे ते उदय सामंत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, "ते MIDC वर लवकर तोडगा काढतील.माझा पाठपुरावा सुरू आहे."

मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष
Nitin Desai News : "...ही वेळ कशामुळे आली याचा छडा लागला पाहिजे"; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंची मागणी

कर्जत एम आय डी सी पाटेगावलाच व्हावी म्हणुन हट्ट करणा-या रोहीत पवारांना मोठा धक्का बसला असून पाटेगाव ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत पाटेगाव मध्ये एम आय डी सी ला विरोध करत एकमताने ठराव मंजुर केला आहे, त्यामुळे अगोदरच नीरव मोदीच प्रकरण गाजत असताना पाटेगाव ग्रामस्थांच्या भुमिकेमुळे नवीन अडचण निर्माण झाली आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे आमदार रोहीत पवार समर्थकांनीही ठरावाला संमती दिल्याने पाटेगाव एम आय डी सी प्रकरणाला वेगळच वळण लागलं आहे.

त्यानंतर आमदार रोहित पवार यांना शरद पवार यांच्याबद्दल प्रश्न करण्यात आला. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पार पडलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर एकत्र आले होते. रोहित पवार म्हणाले की, "अनेक लोकं म्हणत होते की पवार साहेब तिकडे का जात आहेत, पण त्यांना एक संदेश द्यायचा असेल की द्वेषाचं राजकारण जसं आज सुरु आहे, तसं आधी नव्हतं."

मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष
Jagtap Vs Fadnavis: तुमचंही नाव भाई! भिडे गुरुजींच्या नावावरून फडणवीसांचा जगतापांना टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com