esakal | बॉलिवूड कलाकारांना साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य- अमेय खोपकर
sakal

बोलून बातमी शोधा

amey khopkar

बॉलिवूड कलाकारांना साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य- अमेय खोपकर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं, असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलंय. त्याचसोबत बॉलिवूड तारेतारकांनी थोडं संवेदनशील होऊन मदतकार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन त्यांनी केलंय. (mns amey khopkar tweet asking bollywood celebrities to come forwand and help maharashtra in natural calamity slv92)

अमेय खोपकरांचं ट्विट-

'इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

हेही वाचा: रायगड: दरड कोसळलेल्या तळई गावातील दृश्ये

मागील पाच दिवसांपासून राज्यात पावासाने हाहा:कार माजवला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारासह राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त स्थिती, दरड कोसळल्यामुळे आणि इतर दुर्घटनांमुळे राज्यात 80 पेक्षा जास्त जणांना जीव गमावाला लागला. अनेक जण मलब्याखाली गाडले गेलेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. गाई-जनावारांसह पिकांचेही नुकसान झालेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरीसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटानग्रस्त जिल्ह्यांना मदतीची घोषणा केली आहे.

loading image
go to top