राज ठाकरेंची 'ही' कृती पाहून तुम्हीही 'मनसे' म्हणाल; 'वाह क्या बात है!'

राज ठाकरेंची 'ही' कृती पाहून तुम्हीही 'मनसे' म्हणाल; 'वाह क्या बात है!'

मुंबई: मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा होते. एरव्ही त्यांच्या वक्तृत्त्वशैलीची होत असली तरी यावेळी राज ठाकरे यांच्या एका कृतीची जोरदार चर्चा होतेय. राज ठाकरेंवर आजही कार्यकर्ते 'मनसे' आपला जीव ओवाळून का टाकतात, याचं उदाहरण दाखवून देणारी ही कृती आहे, असं म्हणायला हवं. राज ठाकरे यांची लोकप्रियता का टिकून आहे, याचं उत्तर तुम्हाला निश्चितच या कृतीतून मिळेल. आपल्या कार्यकर्त्यांना कसं जपायचं असतं, याचं एक चांगलं उदाहरण राज ठाकरे यांनी घालून दिलं आहे. (MNS Cheif Raj Thackeray help party worker Manoj Chavan)

राज ठाकरेंची 'ही' कृती पाहून तुम्हीही 'मनसे' म्हणाल; 'वाह क्या बात है!'
होय! गाय आमच्यासाठी माता; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना जोरदार सुनावलं

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे 'शिवतीर्था'वर आज गुरुवारी मनसेच्या कामगार सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरु असतानाच अचानकच कामगार सेनेच्या मनोज चव्हाण यांच्या हाताला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांच्या हाताला होणाऱ्या या वेदना काही केल्या थांबत नव्हत्या. यावेळी, स्वत: राज ठाकरे यांनी मनोज चव्हाण यांच्या वेदना कमी करायचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवत मनोज चव्हाण यांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून मदत केल्याचं दिसून आलं. राज ठाकरे यांनी घरात असलेले मलम स्वत: मनोज चव्हाण यांच्या खांद्यावर लावले. त्यानंतर राज यांनी गरम पाण्याने मनोज चव्हाण यांचा हातही शेकवून दिला. राज ठाकरे यांनी नेतेपणाचा कसलाही आव बाजूला सारत एका साध्या कार्यकर्त्याला दिलेली वागणूक पाहून उपस्थितांनाही एका वेगळ्या 'राज ठाकरे'चं दर्शन घडलं. राज ठाकरे यांच्या या कृतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राज ठाकरेंची 'ही' कृती पाहून तुम्हीही 'मनसे' म्हणाल; 'वाह क्या बात है!'
मैत्रीण आहे म्हणजे ती तुमच्या लैंगिक वासनेसाठी उपलब्ध असते, असं नाही: POCSO कोर्ट

राज ठाकरे सध्या राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यासाठी ते सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. अलिकडेच राज ठाकरे यांनी औरंगाबाद, नाशिक आणि पुण्याचा दौरा केला होता. या दौऱ्यांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवतानाही दिसून आले होते. काल बुधवारी राज ठाकरे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थावर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनाही बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाल्याचे समजत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com