esakal | उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? राज ठाकरेंची घणाघाती टीका
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? राज ठाकरेंची घणाघाती टीका

sakal_logo
By
दीनानाथ परब

नाशिक: बहुसदस्यीय प्रभागपद्धतीवर मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी कडाडून टीका केली आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. "यापूर्वी पाच वर्षापूर्वी मी बोललो होतो. पुन्हा एकदा सांगतो, २०१२ ला पहिल्यांदा (ncp) राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचं सरकार होतं. एक उमेदवार होता प्रभाग नावाची गोष्ट नव्हती. (Bjp) भाजपा-शिवसेना सरकारने चारचा प्रभाग केला. निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला, एक उमेदवार पाहिजे. काल त्यांनी तीनचा प्रभाग करायच ठरवलं. मुळात अशी देशात कुठेही पद्धत नाही. कायद्याने बघितलं तर अशी प्रभागपद्धती अस्तित्वात नाही" असे राज ठाकरे म्हणाले.

"महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करुन, पैसा ओतून निवडणूक जिंकणे हा उद्देश आहे" अशी टीका राज ठाकरेंनी केली. "लोकांनी हा त्रास का सहन करायचा. तीन उमेदवारांना मतदान का करायचं? लोकांना गृहित धरायचं, आपल्याला हवे ते प्रभाग करायचे. हे कायदेशीर नाही निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे" असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला अत्याचार

"देशाचा आणि महाराष्ट्राचा कायदा वेगळा आहे का? दोन-तीन चार प्रभाग काय खेळ सुरु आहे. उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? ग्राम पंचायतीला हे चालत नाही आणि महापालिकेला प्रभाग पद्धत. लोकांनी या विरोधात कोर्टात, निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे. निवडणुकीची थट्टा करुन ठेवली आहे" अशी टीका राज ठाकरेंनी केली.

loading image
go to top