संदीप देशपांडेंच्या टी-शर्टवर 'ईडीयट हिटलर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

राज ठाकरेंसोबत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे ईडी कार्यालयात जाणार आहेत. अमित ठाकरेंची पत्नी मितालीही ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी, खबरदारी म्हणून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी राज ठाकरे यांची आज (गुरुवार) 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी होणार आहे, त्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. मनसे सरचिटणीस यांनी आज 'ईटीयट हिटलर' असा टी-शर्ट परिधान केला होता.

राज ठाकरेंसोबत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे ईडी कार्यालयात जाणार आहेत. अमित ठाकरेंची पत्नी मितालीही ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी, खबरदारी म्हणून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना घरातून नेत असताना त्यांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर ईडीयट हिटलर असे लिहिले होते. 

या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राज यांच्याकडून शांततेचं आवाहन करण्यात आले आहे. राजकारण फार टीकत नाही. बहु भी कभी सास बनती है, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे  कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. यावर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Sandeep Deshpande arrested