Raj Thackrey : मनसेच्या सभांनाही गर्दी होते पण मतं मिळत नाहीत, राज ठाकरे म्हणाले...

मनसेच्या सभेला गर्दी होत असली, तरी मते मात्र मिळत नाहीत
Raj Thackrey
Raj ThackreyEsakal

''मनसेच्या सभेला गर्दी होत असली, तरी मते मात्र मिळत नाहीत. सुरुवातीला निवडणुकीत 13 जागा मिळवणारा मनसे पक्ष आता मागे पडत आहेत. आता जरी मनसेने हिंदुत्ववादी मुद्दा घेतला असला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, मनसेची एक जागा निवडून आलेली आहे,'' अशी टीका वारंवार मनसेवर केली जाते. याच प्रश्नावर काल एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमामध्ये त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मला हा प्रश्न खूप जणांनी विचारला आहे. सभांना गर्दी होते पण मत का मिळत नाहीत. 2009 ला माझे 13 आमदार निवडून आले होते. ते काय सोरटवर निवडून आले होते का? भाषणाला सभेला येते त्याच गर्दीने मतदान केलं होतं.

त्यांच्या मतानेच 13 आमदार निवडून आले होते. तर जवळपास 40 ठिकाणी आम्ही दोन नंबरवर होतो. त्याच्यामुळे गर्दीच रूपांतर मतात होत नाही असं नाही. काही फेज असतात. त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट मिळत नसते. काही वेळेला तुमची वेळ वाईट असते काही वेळेला चांगला असतो. आमचा काळ येईल चांगला त्यावेळी येतील निवडून. तर काही वेळेला परिस्थिति वेगळी असते. आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Raj Thackrey
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच, प्राचार्यांनाच केली मारहाण

तर पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्याही सभेला गर्दी व्हायची पण त्यांनाही कुठं मत मिळायची असंही ते यावेळी म्हणालेत. तर बहुमत हे फक्त भाजपला मिळाले आहे. स्पष्ट बहुमत हे 2014 ला आलं आणि ते भाजपला मिळालं. इतकंच काय तर बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला गर्दी व्हायची परंतु त्यांनाही मत मिळायची नाहीत.

मला असं वाटतं की मी जे बोलतो ते महाराष्ट्राच्या हिताच आहे. मी जे बोलतोय ते माझ्या जनतेसाठी बोलतोय. ते त्यांना पटतं. एके दिवशी त्यांना वाटेल आणि तो दिवस येईल अशी मला अशी आशा अपेक्षा आहे. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackrey
Pathaan Release : शाहरुखला दिलासा! 'यामुळे' विहिंप, बजरंग दलाचा 'पठाण'ला असलेला विरोध मावळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com