MNS Raj Thackeray : मनसेचा वर्धापनदिन; कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना वाघाचं गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Anniversary

MNS Raj Thackeray : मनसेचा वर्धापनदिन; कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना वाघाचं गिफ्ट

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापनदिन असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाघाची प्रतिकृती भेट म्हणून दिली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे भगवी शाल आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले आहे. तर सध्या या वाघाची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वर्धापनदिनानिमित्ताने आज सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी वाघाचा पुतळा भेट दिला आहे. हा पुतळा तीन ते चार फूट उंचीचा असून सहा ते सात फूट लांबीचा आहे. या पुतळ्याला उचलण्यासाठी चार ते पाच लोकांची गरज आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी ६ वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन या थिएटरमध्ये मनसेचा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यावेळी राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी पक्षाची ध्येय-धोरणं मांडताना ते नव्या काही घोषणा करण्याची शक्यता मनसेच्या पोस्टमुळं निर्माण झाली आहे.