esakal | नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?; राज ठाकरे कडाडले
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे

नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?- राज ठाकरे

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्य सरकारलाच सध्या महानगरपालिकेच्या निवडणूका नको आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे. प्रशासक नेमून महापालिकेवर वचक ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामाला लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला. मागील दोन महिन्यात राज ठाकरे यांचा पुण्याचा आठवा दौरा आहे.

मनसेच्या पुण्यातील मेळाव्याला 8 विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते हजर होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी सण-उत्सव साजरे करताना लावलेल्या निर्बंधावरुन टीका केली. ते म्हणाले की, सरकार किंवा त्या त्या पक्षाच्या कार्यक्रमाला गर्दी चालते. गणेशोत्सव अथवा दहीहंडीला गर्दी चालत नाही. नियम सर्वांसाठी सारखाच हवा असं मला वाटतेय. नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा: केरळमध्ये निपाह विषाणूचा पुन्हा शिरकाव, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु

महानगरपालिकेवर प्रशासक -

सध्या महानगरपालिकेच्या निवडणूका राज्य सरकारलाच नको आहेत. हे कदाचीत सरकारच्याच फायद्याचं असेल. त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. जर निवडणुका झाल्या नाहीत तर महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा -

ओबीसी आरक्षणावर बोलतानाही राज ठाकरे यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही.

loading image
go to top