PM Modi in Pune : "गांधीजींचे अन् लोकमान्यांचे तात्विक मतभेद झाले पण..."; राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

MNS Raj Thackeray tweet on PM Modi Pune Visit lokmanya tilak award 2023 Mahatma Gandhi
MNS Raj Thackeray tweet on PM Modi Pune Visit lokmanya tilak award 2023 Mahatma Gandhi

लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने आज (१ ऑगस्ट) पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींना देण्यात येत असलेल्या या पुरस्काराबद्दल देखील भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. दिल्लीमध्ये सेवा अध्यादेशाच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींनी चिमटा काढला असून लोकमान्य टिळकांच्या विचारांमध्ये केंद्रीय सत्तेबाबतच्या मांडणीत भाषिक प्रांतरचनेचं महत्व आणि संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्या बाबींना मध्यवर्ती स्थान होते याची आठवण पंतप्रधान मोदींना असेल असं मी मानतो असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

यासोबतच त्यांनी टिळक आणि महात्मा गांधी यांच्यामधील मतभेदांवर देखील बोट ठेवलं आहे. महापुरुषांच्या चारित्र्यहननाच्या काळात टिळकांचा विचारांना पुन्हा उजाळा मिळायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

MNS Raj Thackeray tweet on PM Modi Pune Visit lokmanya tilak award 2023 Mahatma Gandhi
Samruddhi Accident : समृद्धीवर पुन्हा मृत्यूचं तांडव! १७ कामगारांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याचे सखोल चौकशीचे आदेश

राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत?

"आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन ठळक कालखंड ठरवायचे झाले तर अर्थात पहिलं, 'टिळक युग' आणि दुसरं 'गांधी युग' असं करता येईल. १९०० ते १९२० ह्या संपूर्ण कालखंडावर टिळकांचा एकूणच भारतीय सार्वजनिक जीवनावर जो पगडा होता त्याची तुलना होणे शक्यच नाही. असं म्हणतात की एकदा टिळक कलकत्त्याला जायला निघाले, तर त्या प्रवासाला जवळपास ११ दिवस लागले कारण इतक्या मोठ्या संख्येने वाटेतल्या प्रत्येक शहरांत टिळकांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला लोकांची गर्दी जमत होती. तेव्हा खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि मान्यता मिळवलेला हा बहुदा एकमेव मराठी नेता." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे....' असं म्हणणाऱ्या टिळकांच्या स्वराज्याबद्दलच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. त्यांच्या केंद्रीय सत्तेबाबतच्या मांडणीत भाषिक प्रांतरचनेचं महत्व आणि संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्या बाबींना मध्यवर्ती स्थान होते. लोकमान्यांच्या ह्या विचाराचं स्मरण, पुरस्काररुपी आशीर्वाद मिळणाऱ्यांना असेल असं मी मानतो, असेही राज ठाकरे यांनी सुनावलं.

MNS Raj Thackeray tweet on PM Modi Pune Visit lokmanya tilak award 2023 Mahatma Gandhi
PM Modi Pune Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याची सुरूवात गणपती दर्शनाने! दगडूशेठ मंदिरात जय्यत तयारी

"लोकमान्य टिळकांचे समकालीन नेत्यांशी तात्विक मतभेद होते पण त्यांनी ते मतभेद राष्ट्रहिताच्या आड येऊ दिले नाहीत. तसंच मतभेद आहेत म्हणून समोरच्याचं संपूर्ण चारित्र्यहनन करणं हे त्यांच्या कधीही ध्यानीमनी नव्हते. महात्मा गांधीजींचे आणि त्यांचे तात्विक मतभेद झाले पण त्यांनाही टिळकांबद्दल नितांत आदर होता आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवरच पुढे जायचं आहे ह्याचं भान होतं. तसंच टिळकांना देखील उद्याच्या भारतात गांधी हे राष्ट्रनेते ठरू शकतील ह्याची जाणीव होती आणि त्यासाठी टिळकांनी गांधीजींशी कोणतेही वैचारिक मतभेद सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. आज महापुरुषांच्या चारित्र्यहननाच्या काळात टिळकांचा ह्या विचारला पुन्हा उजाळा मिळायला हवा."

"रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं असा आग्रह टिळकांनी धरला होता, ह्यातून राजकारणात फक्त राजकीय आदर्श पुढे येण्याऐवजी प्रतिभाशक्तीचा आदर्श पण यावा असा आग्रह धरणारे टिळक हे खऱ्या अर्थाने द्रष्टे म्हणावे लागतील, ते ह्यासाठी की सद्य परिस्थितीत, 'सत्तेसाठी वाट्टेल ते'चे आदर्श उभे राहात असताना, प्रतिभा आणि संस्कृती किती महत्वाची आहे ह्याची जाणीव त्यांना होती. ह्या लोकमान्य कर्मयोग्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com