esakal | आणीबाणीची वेळ; राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - राज ठाकरे | Maharashtra rain
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे

आणीबाणीची वेळ; राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - राज ठाकरे

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Maharashtra rain : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. मंगळवार (ता. २७)पासून सूरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने मराठवाड्यासह विदर्भात अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकासान झालेय. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेय. राज्यात आणीबाणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलेय?

महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोडांशी आलेलं पीक तर गेलंच आहे. परंतु गरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कर होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत सरकारनं तोबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तात्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.

प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार. तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आता शेतकरी वांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी घ्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.

loading image
go to top