Raj Thackeray : 'तेव्हा नारायण राणे शिवसेनेच्या बाहेर गेलेच नसते...' राज ठाकरेंनी सांगितला किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray : 'तेव्हा नारायण राणे शिवसेनेच्या बाहेर गेलेच नसते...' राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

Raj Thackeray : 'तेव्हा नारायण राणे शिवसेनेच्या बाहेर गेलेच नसते...' राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

मुंबईः मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेर यांनी नारायण राणेंच्या फुटीबद्दल भाष्य केलं. जेव्हा नारायण राणे पक्षाबाहेर जात होते तेव्हा मी त्यांना फोन केला... अन् पुढचा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.

काय म्हणाले राज ठाकरे?

  • शिवसेनाप्रमुखपद एकाला झेपलं नाही दुसऱ्याला झेपेल की नाही, माहिती नाही.

  • त्यांच्या बाजूच्या लोकांना आत्ताच सांगतो. माझं बोलणं झाल्यावर तोंड उचकटू नका.

  • धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांनाच झेपू शकतो

  • नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी फोन करुन विचारलं हे काय करताय?

  • जावू नका. ते म्हणाले बोला बाळासाहेबांशी.

  • मी बोललो. बाळासाहेब म्हणाले घरी घेऊन ये.

  • नंतर बोलले त्यांना नको बोलावू. मागे कोणतरी बोलत होतं हे मला ऐकू येत होतं.

  • अशा प्रकारे लोकांना बाहेर काढणं चालू होतं

नारायण राणे यांनी जावू नये म्हणून आपण त्यांना फोन करुन असं करु नका, अशी विनंती केली त्यांनीही ऐकली. बाळासाहेबांना बोलल्यानंतर तेही बोलायला तयार झाले. मात्र भेटायला निघाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना नको घेऊन येऊ, असं म्हटलं. मागे कुणीतरी सांगत होतं, असा आरोप करुन अशाच पद्धतीने लोकांना पक्षाबाहेर काढल्याचा ठपका राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यावर ठेवला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राजकारणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raj Thackeray