Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, पोलिस म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sandeep 1.jpg

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, पोलिस म्हणाले...

मनसे नेते संदीप देशपांडे हे आज पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हिंदूजा रुग्णलयातील उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, देशपांडे हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली. यावेळी प्रथमदर्शनी हल्ला राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी केल्याची माहिती समोर आली आहे. काही राजकीय नेत्यांची नावं घेत देशपांडेंवर हल्ला झाल्याची माहिती. हल्लेखोरांना ताब्यात घेतलं असून त्यांनी राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला.

Sandeep Deshpande : राज ठाकरे आले, संदीप देशपांडेंना आपली गाडी दिली अन्...

तर दुसरीकडे मनसेनेते अमेय खोपकर यांनी संशय व्यक्त करुन आदित्य ठाकरे आणी संजय राऊत यांनी चौकशी करा अशी मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

मनसे नेते संदीप देशपांडे हे आज पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी अचानक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे.

Sandeep Deshpande : मी घाबरणार नाही... हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंनी दिला इशारा

मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी स्टंपने हल्ला चढवला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली. दरम्यान, देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Sandeep Deshpande