'आधी काका मला वाचवा ऐकू यायचं, आता दिल्लीत...' मनसेचा पवारांना टोला

MNS on Sharad Pawar PM Modi Meeting
MNS on Sharad Pawar PM Modi Meetingesakal

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेतली. यावेळी संजय राऊतांवर झालेली ईडीची कारवाई (ED Action on Sanjay Raut) आणि अन्य काही विषयांवर चर्चा झाली. यावरून आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. स्वतःच्या पुतण्याला वाचविण्यासाठी पवार दिल्लीत गेले होते, असं देशपांडे म्हणाले.

MNS on Sharad Pawar PM Modi Meeting
दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग

काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकवटर्तीयांवर कारवाई केली होती. तब्बल तीन ते चार दिवस ही कारवाई चालली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी ईडीने संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर शरद पवारांनी मोदींची भेट घेतली. यावरूनच संदीप देशपांडे म्हणतात, ''1773 साली "काका मला वाचवा" अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याशा वेगळ्या संदर्भात "माझ्या पुतण्याला वाचवा" अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या.''

शरद पवारांची मोदींसोबत काय चर्चा? -

राज्यात ईडी कारवाईचा धडाका सुरू आहे. राऊतांवर झालेल्या कारवाईला २४ तास उलटत नाहीतर पवारांनी मोदींची भेट घेतली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. पण, मोदींसोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत पवारांनी स्वतः माहिती दिली. लक्षव्दीपमधील नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी मोदींची भेट घेतली. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांनी खूप चुकीचे निर्णय घेतले. ज्यानंतर ७५ हजार लोकांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं. याबाबतच मोदींसोबत चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणीही पवारांनी केली. तसेच राज्यात होत असलेल्या तपास यंत्रणांच्या कारवायांबाबत देखील चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com