'ना हिंदुत्वावर ना नामांतरणावर, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा': संदीप देशपांडे | Sandeep Deshpande on Uddhav Thackeray Speech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray Speech

'ना हिंदुत्वावर ना नामांतरणावर, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा': संदीप देशपांडे

मुंबई : काल ओरंगाबाद येथे झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. भोंगा प्रकरण, काश्मिरी पंडीत, पैगंबरावर टीका केल्याप्रकरणी भारताला माफी मागावी लागते अशा बऱ्याच विषयावरून त्यांनी भाजपला धारेवर घरले आहे, औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या भाषणानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

(Sandeep Deshpande ON CM Uddhav Thackeray)

काल मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथील सभेत शहराच्या नामकरणावरून बोलताना ते म्हणाले की, शहराचं नाव संभाजीनगर होईलंच पण संभाजीनगर या नावाला शोभेल असं शहर आपल्याला तयार करायचं आहे. शहरासाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तो आधी सोडवायचा आहे. पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर संभाजी राजे मला टकमक टोकावर नेतील असं ते म्हणाले होते. पण मनसेचे संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा: गंगायान : भारत 2023 मध्ये राबवणार सागरी आणि अंतराळ मानवी मोहीम

मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार... फक्त लावंगीच्या फुसक्या माळा." असं ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

दरम्यान मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवसेनेने सभा घेतली आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने ही सभा 'एका दगडात दोन पक्षी' अशी झाली आहे. औरंगाबादची लोकसभेची जागा गमावल्यानंतर शिवसेना महापालिकेत आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर विविध विषयाला धरून टीका केली आहे.

Web Title: Mns Sandeep Deshpande On Cm Uddhav Thackeray Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top