मनसेकडून शरद पवारांचा बृजभूषण सिंहसोबतचा दुसरा फोटो ट्विट; काय म्हणाले संदीप देशपांडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS tweeted another photo of Sharad Pawar with Brijbhushan Singh

मनसेकडून पवारांचा बृजभूषणसोबतचा दुसरा फोटो ट्विट; काय म्हणाले देशपांडे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. विरोध म्हणजे एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याच आरोपासंदर्भातले संकेत देणारे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. आता पुन्हा मनते नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी एक फोटो शेअर केला आहे. ‘आता ही बैठक कधी झाली आणि अशा किती बैठका झाल्या #सापळा’ असा प्रश्न त्यांनी ट्विट करून विचारला आहे. (MNS tweeted another photo of Sharad Pawar with Brijbhushan Singh)

मागे शेअर केलेल्या फोटोमध्ये राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दिसत होते. मंचावर शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते बसलेले दिसत होते. ‘कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है’, असे सूचक कॅप्शनही देण्यात आले होते.

हेही वाचा: होणाऱ्या सासूचे शब्द ऐकून वधूने भर मंडपात दिला लग्नास नकार

आता संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी एक फोटो शेअर केला आहे. यात शरद पवार व खासदार बृजभूषण सिंह सोबत उभे दिसत आहे. यावेळी या फोटोला ‘आता ही बैठक कधी झाली आणि अशा किती बैठका झाल्या #सापळा’ असे कॅप्शन दिले आहे. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटरवर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मनसेने दोन फोटो शेअर केले आहेत. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटरवर फोटो वॉर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Mns Tweeted Another Photo Of Sharad Pawar With Brijbhushan Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top