MNS: मनसे विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मनसेच्या एका ३३ वर्षीय विभाग अध्यक्ष बलात्काराचा गुन्हा वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
MNS Vrushant Wadke A case of rape has been registered
MNS Vrushant Wadke A case of rape has been registered esakal
Updated on

नुकत्याच गणपती विसर्जनमध्ये झालेल्या राड्यात लोकप्रतिनिधींनी गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच, मनसेच्या एका ३३ वर्षीय विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. (MNS Vrushant Wadke A case of rape has been registered )

MNS Vrushant Wadke A case of rape has been registered
Abdul Sattar: मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापलं

आरोपीने ४२ वर्षीय महिलेला येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. तसेच, सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान विविध आमिष दाखवून विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी वृशांत वडके यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 500 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MNS Vrushant Wadke A case of rape has been registered
Ashish Shelar: मी आजपासून 'कुरेशी' आहे; आशिष शेलारांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसेच्या वरिष्ठांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली होती. चार दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता.

आरोपी हा गिरगावमध्येच वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. मनसे पदाधिकाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात विविध उपक्रमात, तसेच वेळोवेळी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात केलेल्या कार्याची दखल घेत मनसेच्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्षपदी वृशांत वडके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com