esakal | Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडायची असल्यास मनसे देणार संरक्षण!
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मनसेचं संरक्षण!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri violence) येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी ठार झाले. मात्र, केंद्र सरकारने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. व्यापाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मनसे (MNS supprt traders) पुढे सरसावली आहे.

शेतकऱ्यांवर झालेला अन्याय निषेधार्थ आहे. पण बंद पुकारून जनतेचे नुकसान होत असून गेल्या दीड वर्षांत जनता पिचली जात आहेत. आता दीड वर्षानंतर सर्व खुलं होत असताना हा बंद सरकारकडून पुकारणे हाच एक निषेध आहे, असे मनसेचं म्हणणे आहे. पोलिस प्रशासन बंदसाठी सरकारच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा मनसेचा आरोप आहे. व्यापाऱ्यांना दुकाने उघडायची असल्यास मनसे संरक्षण देणार, असेही मनसेकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये दोन गाड्या घुसविण्यात आल्या. यामध्ये ४ शेतकरी चिरडून ठार झाले. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याला अद्यापही अटक करण्यात आली नव्हती. वाढत चाललेला दबाव बघता अखेर त्याला रविवारी अटक करण्यात आली. पण, यामध्ये केंद्र सरकारने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय.

loading image
go to top