मनसेला सभांसाठी रस्त्यांवर हवी परवानगी; निवडणूक आयोगाला पत्र

मिलिंद तांबे
Thursday, 10 October 2019

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसोबतच पावसाने ही जोरदार बॅटिंग सुरू केल्याने राजकीय नेत्यांनी मोठी पंचाईत झाली आहे. पावसामुळे मैदानांमध्ये चिखल झाल्याने राजकीय पक्षाना आपल्या सभा रद्द कराव्या लागत आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघात 9 तारखेचा मुहूर्तावर राज ठाकरेंची सभा होती.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त पावसामुळे हुकला. याची रुखरुख नेत्यांना मनाला लागली आहे. कसबा मतदारसंघातील मैदानात चिखल झाल्याने राज ठाकरे यांची जाहीर सभा रद्द करावी लागली. यामुळेच पुढे देखील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन सभांसाठी रस्त्यांवर परवानगी द्यावी असे पत्र मनसेने राज्य निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसोबतच पावसाने ही जोरदार बॅटिंग सुरू केल्याने राजकीय नेत्यांनी मोठी पंचाईत झाली आहे. पावसामुळे मैदानांमध्ये चिखल झाल्याने राजकीय पक्षाना आपल्या सभा रद्द कराव्या लागत आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघात 9 तारखेचा मुहूर्तावर राज ठाकरेंची सभा होती. मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने राज यांना आपली पहिली सभा रद्द करावी लागली. मात्र, हवामान खात्याने 20 ते 21 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने पुढील सभांवर देखील पावसाचं सावट आहे. यामुळे रस्त्यांवर सभांसाठी परवानगी द्यावी अशी पत्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

लोकांना अडचण होईल अश्या ठिकाणी किंवा रहदारीच्या रस्त्यावर जाहीर सभांसाठी परवानगी दिली जात नाही. यामुळे अनेक राजकीय पक्षांनी सभांसाठी खासगी मैदान आरक्षित केली आहेत. मात्र, पावसामुळे या मैदानांवर पाणीचपाणी झाले आहे.अश्या परिस्थितीत सभा घेणे अशक्य आहे. मात्र, सभा नाही झाल्या तर याचा फटका उमेदवारांना बसू शकतो अशी भीती ही मनसेने आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS writes letter to election Commission and wants campaign rally on road