
मुंबईत पोहोचण्याधीच अपक्ष आमदार जोरगेवारांचा मोबाईल चोरीला
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीत तिन्ही सत्ताधारी पक्षांना ताकद दाखवल्यानंतर भाजपला जोर चढला आहे. या वेळीही पाचवी जागा निवडून आणण्यावर भाजप ठाम आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सूत्र लढवायला सुरुवात केली आहे. विधानपरिषदेचा रस्ता सुकर करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसची भिस्त अपक्षांवर आहे. त्यामुळे जमेल तितक्या अपक्षांना मुंबईत येण्यासाठी विविध पक्ष निमंत्रण देत आहेत. (Kishor Jorgewar)
दरम्यान, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार देखील मुंबईला रवाना होण्यासाठी निघाले होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांचा मोबाईल चोरीला गेलाय.
मुंबईकडे प्रवास करत असताना जोरगेवार यांचे दोन्ही मोबाईल चोराने लंपास केले. पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना रेल्वेतील भुरट्या चोरांचा फटका बसला आहे. जोरगेवार राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाआधी मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यांनी घोडेबाजार या शब्दावर आक्षेपही घेतला होता. ही निवडणूक पार पडल्यानंतर ते पुन्हा मतदारसंघाकडे रवाना झाले.
आज पहाटे सोलापूरहून येताना सिध्देश्वर एक्स्प्रेसमधून आमदारांचे 2 महागडे फोन चोरीला गेले. फस्ट क्लास एसी कोचमधून मोबाईल चोरीला गेल्याने रेल्वेच्या एसी सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पंचायतराजचा दौरा आटोपून मुंबईला येताना आज पहाटे घटना घडल्याची माहिती मिळतीय.
Web Title: Mobile Of Mla Kishor Jorgewar Theft By Unknown Before Mlc Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..