Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात चार दिवस पुन्हा पाऊस...हवामान विभागाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

महाराष्ट्रात चार दिवस पुन्हा पाऊस...हवामान विभागाचा इशारा

sakal_logo
By
ओमकार वाबळे

पुढच्या 4 दिवसात राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह मध्यम व किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणी संलग्न मराठवाडा भाग या पावसामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, आयएमडीचे संचालक के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात मोठी घट झालीय. यामध्ये नागपूर आणि अकोल्यात थंडीची लाट सुरुवात झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. सध्या राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झालीय. नाशिक, नागपूरला मागे टाकत पुण्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढला आहे. दिवाळी दरम्यान पुण्यात पाऊसही झाला होता. त्यानंतर अचानक थंडी वाढली आहे.

वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली. पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

loading image
go to top