

Mysterious Contagious Disease Kills Cattle in Mokhada Villages
Sakal
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील जोगलवाडी, शेळकेवाडी, राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना विचित्र संसर्गजन्य रोगाचे लागण झाली आहे. या भागात एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त झाले आहेत. जनावरांच्या फऱ्याला सूज येणे, पोट फुगणे, गळा सुजणे, लघवी अटकने, ताप येणे असे आजाराचे लक्षणे आहेत.