

Farmer Attempts Self-Immolation Inside Mokhada Tehsildar Office
Sakal
मोखाडा : मोखाड्यातील खोच–शिरसोनपाडा येथील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप करत अर्जदार राजु भाऊ मालक (वय २६ ) यांनी आज नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.