
मुक्ताईनगर : गपुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर एका बसमध्ये तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडालेली असताना मुक्ताईनगरातील यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यासह पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह पाच टवाळखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे.