
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, २२ मे रोजी अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे हवामानीय क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना त्याची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. \
सध्या या क्षेत्रामुळे चक्रीवादळ तयार होणार की नाही याबाबत निश्चितता नसली, तरी या प्रणालीमुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.