पुण्यासह सहा जिल्ह्यांना "रेड अलर्ट'; राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता. 22) हवामान खात्याने "रेड अलर्ट' दिला आहे.

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता. 22) हवामान खात्याने "रेड अलर्ट' दिला आहे. पुणे जिल्ह्यात मंगळवारी संपूर्ण ढगाळ वातावरण राहील. तसेच, पुढील दोन दिवस पुणे शहरासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून त्यानंतर तो कमी होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपि म्हणाले, ""पूर्व-पश्‍चिम कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात, तसेच ओरिसाच्या किनारपट्टीवर उत्तरेत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे.'' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. कोकण, गोव्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस हजेरी लावेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी दोन दिवस पावसाच्या सरी पडतील. त्यानंतर मात्र, तेथे पावसाचा जोर ओसरेल. विदर्भात दोन दिवस सलग पावसाची शक्‍यता असून, त्यानंतर हळूहळू पावसाचे प्रमाण कमी होईल, असेही काश्‍यपि यांनी स्पष्ट केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील पाऊस 
(संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत. सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 
पुणे : 26 
नाशिक : 21 
रत्नागिरी : 13 
औरंगाबाद : 58 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon active again in the state Red alert to six districts including Pune