esakal | देशावर ‘पर्जन्यमाया’ कायम; मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के पावसाचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

rain

भारतीय हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी मॉन्सून हंगामातील पावसाचा पाहिला अंदाज वर्तविला होता. यात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

देशावर ‘पर्जन्यमाया’ कायम; मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के पावसाचा अंदाज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात १०४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला. या अंदाजात ८ टक्क्यांची कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

भारतीय हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी मॉन्सून हंगामातील पावसाचा पाहिला अंदाज वर्तविला होता. यात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर १ जून रोजी जाहीर केलेल्या सुधारीत अंदाजात देशात १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता.३१) हवामान विभागाने मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील (ऑगस्ट ते सप्टेंबर) महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात यंदाच्या मॉन्सून हंगामात १०४ टक्के पाऊस पडणार असून, ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात ९ टक्के तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

प्रिन्सीपल कांम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) व मॉन्सून मिशन कपल्ड फॉरकास्टींग सिस्टिमनुसार (एमएमसीएफएस) हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो. सर्वसाधारणपणे मॉन्सून एकूण हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसापैकी ४९ टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो. १९६१ ते २०१० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार या दोन महिन्यात देशात ४२८.३ सेमी पाऊस होतो.  

प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान आणि वातावरणीय स्थिती ही ‘एल निनो’ थंड मात्र सर्वसामान्य स्थितीत असल्याचे संकेत देत आहेत. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल नुसार मॉन्सून प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान आणखी थंड होणार आहे. मात्र मॉन्सून हंगामात एल-निनो सर्व सामान्य स्थितीच राहणार आहे. हिंद महासागरातील पाण्याचा पृष्टभागाच्या तापमानाचाही मॉन्सूनवर प्रभाव पडतो. इंडियन ओशन डायपोलही (आयओडी) सर्वसामान्य स्थितीत राहणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉन्सून मिशन मॉडेलनुसार सरासरीपेक्षा अधिक पाऊस 
प्रिन्सीपल कांम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) मॉडेलनुसार १०४ टक्के पावसाचा अंदाज असला तरी, मॉन्सून मिशन कपल्ड डायनामिक फारेकास्ट सिस्टमनुसार दुसऱ्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानुसार ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यात देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

धरणांमध्ये ३८ टक्के साठा
पुणे : जून महिन्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली मात्र जुलै महिन्यात धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याच नाहीत. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांत अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ५५२ टीएमसी (३८ टक्के) पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा जून महिन्यातच राज्यातील सर्वच विभागांमध्ये पाणीसाठा वाढू लागला. तर जुलै महिन्यात धरणांच्या पाणलोटात पावसाने ओढ दिली आहे.