
पुणे : मॉन्सून केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते सध्या स्थिर आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.