
IMD: यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. राज्यासह देशामध्ये नेमका पाऊस कसा असेल, याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यानुसार मॉन्सून हंगामातील सरासरीपेक्षा १०५ टक्के जास्तीचा पाऊसकाळ असेल, अशी शक्यता आहे.