Video : आमदारांना किती हा त्रास! 'कॅन्टीन'मध्ये खायला मिळेना, कुणीही येतंय धक्का देतंय, वॉशरुममध्ये पाणी वाहतंय...

monsoon session 2023
monsoon session 2023esakal

मुंबईः विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज दहाव्या दिवशी विधान परिषदेत जरा वेगळंच चित्र बघायला मिळालं. जनतेचे प्रश्न मांडता मांडता आमदारांनी स्वतःचेच प्रश्न मांडायला सुरुवात केली. विधीमंडळाच्या आवारात लोकांची गर्दी होतेय, त्यामुळे काय काय त्रास सहन करावा लागतो, याचा पाढाच आमदारांनी वाचला.

गर्दीने मंत्र्यालाच दिला धक्का

विधान परिषेदेचे आमदार विक्रम काळे सभागृहात बोलतांना म्हणाले की, अधिवेशन काळात आतमध्ये येण्यासाठी प्रवेशिका दिल्या जातात. मात्र सध्या जी लोकांची गर्दी दिसतेय, त्यामुळे शंका येत आहे. आपण गॅलरीत फिरतो तेव्हा इतकी गर्दी असते की आमदारांना धक्काबुक्की होते. आता मी येत होतो तेव्हा कुणीतरी मंत्र्यांना धक्का मारला. अधिवेशन काळात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घ्या. अशी मागणी काळेंनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली.

monsoon session 2023
Chhota Rajan Acquitted: दत्ता सामंत खून प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

दहा हजार रुपयांमध्ये मिळतो पर्मनंट पास- दरेकर

आमदार काळेंनंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर बोलायला उभे राहिले. तोच मुद्दा पुढे नेत ते म्हणाले की, हा विषय गंभीर झाला आहे. मी असं ऐकलंय की, विधीमंडळाच्या आवारात येण्यासाठी प्रवेशिकांची विक्री होते. एका दिवसासाठी एक हजार रुपयांमध्ये पास आणि दहा हजारांमध्ये पर्मनंट पास; असे दलाल फिरत आहेत का? याची चौकशी करा. आम्हांला पास लागतो इतर मात्र सर्रास फिरत आहेत, असा मुद्दा दरेकरांनी मांडला.

'कॅन्टीन'मध्ये एवढी गर्दी असते की आमदारांना ताटकळत उभं राहावं लागतं- परब

त्यानंतर बोलतांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले की, स्वच्छता मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री यांच्या बाजूला जे स्वच्छतागृह आहे तिथे धो-धो नळं वाहात आहेत. ज्या मंत्र्यांकडे कारभार आहे त्यांच्या बाजूच्या स्वच्छतागृहांमध्ये अशी अवस्था आहे. स्वच्छतामंत्री भाषणं देतात परंतु त्यांच्या बाजूला काय होतंय ते दिसत नाही का?

monsoon session 2023
Nana Patole: पवारांच्या बैठकीत काय झालं? 'इंडिया'ची बैठक कधी? विरोधीपक्ष नेता कधी ठरणार?; पटोलेंची सविस्तर माहिती

परब पुढे म्हणाले, संध्याकाळी साडेपाच वाजता आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी काहीही मिळत नाही. रात्रीपर्यंत अधिवेशन चालवायचं म्हटल्यावर कसं होणार? कॅन्टीनमध्ये एवढी गर्दी असते की आमदारांना ताटकळत बसावं लागतं.

काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले की, मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालय परिसरामध्ये एवढे फ्लेक्स लागलेले आहेत की किळसवाणं चित्र दिसून येतं. मंत्र्यांच्या गेटवर, भीतींवर बॅनर्स लागलेले आहेत. अशा पोस्टरबाजीवर मंत्रालय परिसरात बंदी आणावी, अशी मागणी जगताप यांनी केली.

नीलम गोऱ्हेंनी दिलं आश्वासन

आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उपसभापती कार्यालयातून आमदारांना, मंत्र्यांना, सामाजिक संघटनांना किंवा मी ज्यांना ओळखते त्यांच्याशिवाय त्यांना पास दिला जातो. इतरांना पास दिला जात नाही. आपल्याला कुणी संशयास्पद फिरतांना दिसला तर चौकशी करा, कुणाकडून पास आणला ते विचारा. मीदेखील असं विचारत असते.

गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, बुधवारी अधिवेशन सुरु होईल तेव्हा मी अधिकाऱ्यांची बैठक घेते आणि या सगळ्या प्रश्नांबाबत तोडगा काढण्याच्या सूचना करते. अधिकाऱ्यांनी ही चर्चा ऐकली असेल तर ठीक. पण अनेकदा म्हणतात प्रोसिडिंग ऐकलं नाही. त्यामुळे मी सूचना करते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com