शिक्षण विभागात भ्रष्टाचार! बदल्यांसाठी घेतली जातेय लाच? रोहित पवारांनी सभागृहातच वाचलं रेट कार्ड | Rohit Pawar

Rohit Pawar
Rohit Pawar Sakal

मुंबई : पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण विभागामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं रेट कार्ड असतं तसं शिक्षण विभागातील बदल्यांसाठी रेड कार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना केला. हे रेटकार्ड त्यांनी सभागृहात सादर केलं आहे.

शिक्षण विभागातील बदल्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर एखादा अधिकारी सामान्यांना म्हणू शकतो की, मी इथे पैसे देऊन आलो आहे. यामुळे सामान्य माणसांचं काम होणार नाही. ते सरकारी सेवेपासून वंचित राहू शकतात. शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भातील पत्र एसीबीला स्वत: दिलं अशी परिस्थिती आहे. शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार सुरू आहे असा आरोप त्यांनी सभागृहात केला आहे.

Rohit Pawar
Video Viral : प्राण्यांचा अजय देवगण! म्हशींच्या पाठीवर कुत्रा; 'फूल और काँटे' स्टाईल केली थाटात एंट्री

"कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी १ लाख घेतले जातात. मेडिकल बील मंजुरीसाठी २० टक्के घेतले जातात. आपण जर हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं मेनू कार्ड असतं तसं एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल पाठवायची असेल तर दक्षिणा घेतला जातो. जर शिक्षण विभागामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर हे खूप भयानक आहे. शिक्षण आयुक्तांनी जी तक्रार एसीबीला केली होती त्याचं पुढं काय झालं? असा प्रश्न मी सभागृहात करत आहे" असं रोहित पवार सभागृहात बोलताना म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com