पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास यंदा वेगाने सुरू आहे. मॉन्सूनचे प्रवाह बळकट झाल्याने रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मॉन्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी कायम होती.