मृत्यूच्या छायेत राहणारे दरडग्रस्त मानसिक तणावात, डाॅक्टरांकडून समुपदेशन

मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी दरडग्रस्तांचे समूह समुपदेशन व औषधोपचार
doctor counselling
doctor counsellingsakal media

अलिबाग : २२ जुलैच्या रात्री घडलेल्या नैसर्गिक आपत्तीत (monsoon tragedy) घरदार आणि नातलग गमावलेल्या दरडग्रस्तांना (land slide) मोठा मानसिक आघात (mental shock) बसला आहे. थोडा जरी पाऊस पडला (little rain fear) तरी दरड कोसळण्याची भीती या लोकांना सतत जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या आपत्तीनंतर सतत जाणवणारी भीती हे मानसिक रोगाचे (mental diseases) चिन्ह आहे. याला शास्त्रीय भाषेत ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ म्हटले जाते. जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून (psychiatrist) या रुग्णांचे समूह समुपदेशनासह (counselling) औषधोपचार करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाचे एक पथक तळीये, साखर-सुतारकोंड, केवनाळे आणि महाडच्या पूरग्रस्त भागांत दरडग्रस्तांचे समुपदेशन करीत आहे.

जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार परिचारिका यशोदा बेजलाकल, समाजसेवा अधीक्षिका धनश्री कडू यांचे पथक येथे काम करीत आहे. येथील रहिवाशांना काहीतरी विपरीत घडेल, या भीतीने घेरले आहे. त्यांच्या मनावर काही घटनांचा जबरदस्त मानसिक आघात बसला आहे. सतत नातलगांचा विचार, उद्ध्वस्त झालेला संसार, आर्थिक चणचणीमुळे येथील रहिवाशी अस्थिर भावना घेऊन जगत असल्याची निरीक्षणे पथकाने नोंदवली आहेत.

doctor counselling
श्रीवर्धन मध्ये सापडला २२ किलोचा घोळ मासा, मच्छिमार झाले मालामाल

या आघातातून बाहेर निघण्यास पूरग्रस्तांना काही महिने वा वर्षही लागू शकते. पथकातील मानसोपचार तज्ज्ञांनी दरडग्रस्तांना बोलते केले, काहींशी वैयक्तिक संवाद साधला. यातून जाणवलेली लक्षणे काहींनी बोलून दाखवली. सतत भीती वाटणे, भूक न लागणे, निद्रानाश, अचानक झोपेतून जाग येण्यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशी लक्षणे असलेल्या ६० जणांवर औषधोपचार सुरू असल्याचे पथकाच्या वतीने सांगण्यात आले.

दरडग्रस्त गावांत मृतांचे मुंबई तसेच सुरत येथे राहणारे नातेवाईक आले आहेत. त्यांच्यातही मानसिक आजाराची लक्षणे दिसून असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केवनाळे या दरडग्रस्त गावात ३५ ते ४० घरी जाऊन या पथकाने विचारपूस केली. थोडा जरी पाऊस कोसळू लागला तरी भीती वाटते, असे तळीयेतील नागरिकांचे म्हणणे आहे. या गावात ८० ते ८५ लोकांना प्रत्यक्ष भेटून ३२ लोकांना औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.

doctor counselling
डिजिटल मीडिया नियमावली माध्यम स्वातंत्र्यावर परिणामकारक ? हायकोर्टात दावा

तर शुक्रवारी पोलादपूर तालुका साखर सुतारवाडी या गावातील ५० हून अधिक लोकांची भेट घेण्यात आली. त्यातील १७ जणांवर या डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले. याशिवाय केवनाळे, आंबेमाची येथे दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे समूह समुपदेशन करण्यात आले. यातील आठ जणांना धीर देण्यात आला. महाड तालुक्यातील पूरग्रस्त आसणपोई, बापटनगर येथील महिलांना बोलते करून मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पूरग्रस्तांपेक्षा दरडग्रस्तांमध्ये भीती अधिक असल्याचे दिसून आले, असे पथकातील डॉक्टरांनी नमूद केले.

''आजूबाजूचे सर्वचजण दुःखात असल्याने मानसिक ताण कमी होणे शक्य नसतो. जिल्हा रुग्णालयाने तीन दिवस या रुग्णांचे समुपदेशन केले आहे. यातील काहींवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत''.

- डॉ. अमोल भुसारे

मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com