
गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे
या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज
गेल्या तीन-चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे कोकणात पुन्हा दमदार पुनरागमन झाले आहे. कोकणसह अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असून, यापूर्वी केलेल्या पेरण्यांवरील संकटही टळणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (monsoon update maharashtra this weekend start)
हेही वाचा: रिफायनरीसाठी काही चिरीमिरी लोक विरोध करत आहेत पण..., : निलेश राणे
गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्यातही हलका ते मध्यम पाऊस झाला असून दक्षिण कोकणात तुलनेत अधिक पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यात १० जूनला मॉन्सूनचे आगमन झाले आहे. सलग दोन दिवस कोकणात बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली. पावसामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली असून ५० ते ६० टक्के पेरण्या उरकल्या आहेत. त्यानंतर मॉन्सूनचा प्रवाह पूर्णतः मंदावला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुबार पेरणीच्या संभाव्य संकटाने शेतकरी विचारांच्या गर्तेत सापडला होता.
हेही वाचा: टोमॅटोसारखे गाल असणाऱ्या NCP नेत्याचं हे षडयंत्र, सदाभाऊंचा रोख कुणावर?
दरम्यान, पुन्हा एकदा कोकणात पावसाचे वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली. वैभववाडी आणि कणकवलीच्या काही भागात तासभर दमदार पाऊस झाला. पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने काही अंशी आता पेरण्यांना त्या पोषक आहेत. परिणामी या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. यापूर्वी झालेल्या पावसात केलेल्या भातपेरणीवरील संकट या पावसाने टळले आहे. या पावसानंतर शेतीच्या कामांचा वेग वाढणार आहे. त्यातच पुढील दोन दिवस मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती असल्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Web Title: Monsoon Update Maharashtra This Weekend Monsoon Start Possibility Says Imd
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..