esakal | मॉन्सूनची विदर्भ, मराठवाड्यात मुसंडी, मुंबई पुण्यात मात्र....
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon in Vidarbha and  Marathwada but no rain in Mumbai and Pune

कर्नाटकात मुक्काम केलेल्या मॉन्सूनने मोठी मजल मारत गुरुवारी (ता. 11)  राज्यात हजेरी लावली. त्यानंतर सलग तीन दिवस राज्याचे वेगवेगळे भाग तो व्यापत आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली, बारामती हे भाग मॉन्सूनने यापूर्वीच व्यापले आहेत. आता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सनने प्रगती केली. नगर, औरंगाबाद, गोंदिया या भागात मॉन्सूनचे वारे पोचले असल्याचे हवामान खात्याने शनिवारी जाहीर केले.

मॉन्सूनची विदर्भ, मराठवाड्यात मुसंडी, मुंबई पुण्यात मात्र....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे: राज्यात सलग तिसऱया दिवशी नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) राज्यात प्रगती करत विदर्भ आणि मध्य मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली. मात्र, या प्रवासात मॉन्सूनने पुणे आणि मुंबई शहरांना अद्यापही वगळले आहे.

कर्नाटकात मुक्काम केलेल्या मॉन्सूनने मोठी मजल मारत गुरुवारी (ता. 11)  राज्यात हजेरी लावली. त्यानंतर सलग तीन दिवस राज्याचे वेगवेगळे भाग तो व्यापत आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली, बारामती हे भाग मॉन्सूनने यापूर्वीच व्यापले आहेत. आता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सनने प्रगती केली. नगर, औरंगाबाद, गोंदिया या भागात मॉन्सूनचे वारे पोचले असल्याचे हवामान खात्याने शनिवारी जाहीर केले. अरबी समुद्रावरील मॉन्सूनच्या शाखेची प्रगती करण्यास पोषक वातावरण निर्माण होण्यास अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस
कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी येत्या रविवारी (ता. 14) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजदेखिल वर्तविण्यात आला आहे. येत्या सोमवार (ता. 15) आणि मंगळवारीही (ता. 16) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी राज्याच्या समुद्र किनाऱयावर सोसाट्याचा वाहील, असेही सांगण्यात आले आहे. 

पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
पुणे शहर आणि परिसरात येत्या चोविस तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची 25 ते 50 टक्के शक्यता आहे, अशी माहिती हवामाना विभागातर्फे देण्यात आली. पुण्यातील शिवाजीनगर वेधशाळेत एक जूनपासून आतापर्यंत 109,9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पाषाण येथे 111.4 आणि लोहगावमध्ये 195.1 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.
......................