

El Niño impact raises drought fears as Maharashtra expects below-normal rainfall.
sakal
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामावर ‘एल-निनो’चे सावट असल्याने यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातदेखील कमी पर्जन्यमानाचे संकेत दिले आहेत.