
मुंबई : राज्यात वेळेपूर्वीच दमदार आगमन केलेल्या मॉन्सूनने आज मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईतील मे महिन्यात १०७ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस होता. या विक्रमी पावसाने अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले. वेगाने प्रवास करणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी आज पुणे, सोलापूर, धाराशिवपर्यंत धाव घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पावसाच्या या तडाख्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजाही गांगरला आहे.