... म्हणून यंदा जून महिना आलाय वेगळ्याच चर्चेत

The month of June has come in a different discussion than every year
The month of June has come in a different discussion than every year

जून महिना दरवर्षी अनेक कारणांनी चर्चेत असतो. या महिन्यात शाळा सुरु होतात. दहावी व बारावीचे निकाल लागतात. महाविद्यालय सुरु होत असल्याने खरेदीसाठी तरुणाईची लगबग असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षाचा पहिला (पावसाळ्यातला) पाऊस याच महिन्यात पडतो. पण यंदा दरवर्षीच्या तुलनेत करोना व्हायरसमुळे वेगळ्याच कारणाने हा महिना चर्चेत आहे. अजून निकाल लागले नाहीत, की शाळा सुरु झाल्या नाहीत.

उन्हाळा संपून जूनमध्ये पावसाळा सुरु होतो. या महिन्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांची जय्यत तयारी सुरु होते. जूनच्या सुरुवातीत पावसाच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. त्यात काहींना पावसाळी पिकनिकचे वेध लागलेले असतात. जून हा अनेक पध्दतीने साजरा केला जातो. शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने शाळेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, शेतात खरीपाच्या पेरण्या केल्या जातात. तर बाकीचे कॉमन मॅन हे पावसापासून बचावासाठी छत्री, रेनकोटची खरेदी करतात. 
पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं नियोजनही अनेकजण करतात. काहीजण तर पावसाळ्यात आपलं घर गळत असेल तर त्याची सुद्धा दुरुस्ती करतात. 

जूनमध्ये पडलेल्या पावसाने निसर्गाचं सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाल्यासारखे वाटते. आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्याला अशा निसर्गरुपामुळे उर्जा मिळते. निसर्गाच्या कुशीत रमण्याचा हा अविस्मरणीय अनुभव असतो. त्यामुळे एरवी धकाधकीच्या जगात वावरणारी मंडळी ‘जस्ट फॉर चेंज’ आणि ‘रिफ्रेश’ होण्यासाठी फिरायला जातात. परंतु यावर्षी जूनमधील सर्व नियोजन करुनसुध्दा जगभरात धूमाकूळ घातलेल्या करोना व्हायरसमुळे सर्व बंद आहे. त्यामुळे हा महिन्या चर्चेत आहे. महाराष्ट्रात यावर्षी अपवाद वगळता समाधानकार पाऊस पडल्याने गारवा मिळाला खरा पण कोरोनामुळे अनेकांचे नियोजन फसले आहे. 

जून आला म्हणजे आता लवकरच शाळा सुरू होतील. म्हणजे पालकांची आपल्या पाल्याला शाळेत पाठवायची तयारी करायची वेळ झाली. म्हणजे वहया, पुस्तक यांना कव्हर लावा. किती नवलाई! किती उत्सुकता! किती नवीन गोष्टी! वर्गसुद्धा नवीन. सगळ्यांसाठीच नाही हं! काही जण परत परत त्याच वर्गात बसतात. बसू दे ना. आवडत असेल एखाद्याला तोच तोच वर्ग असेही काहीजण असतात. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना पावासाळ्याच्या दिवसात फिरायला खूप आवडतं. या दिवसातील पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुंगध अनेकांना प्रफुल्लीत करतो. त्यावेळी नभ दाटून येतात अधूनमधन मेघगर्जना कानी पडत असते.

प्रत्येकजण कित्येक महिन्यापासून तयारी करतात. कोणत्या पर्यटनस्थळी जायचे... कोणत्या मार्गाने जायचं... कोणकोण जायचे....किती दिवसांची ट्रिप काढायची... ट्रिपसाठी काय काय शॉपिंग करायची असे एक ना अनेक प्लॅनिंग करत असतात. परंतु यावर्षी करोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळमुळे या गोष्टींचा आपल्याला आनंद घेता येऊच शकत नसल्यामुळे अनेकांची नाराजी दिसून येत आहे त्यामुळे अनेकांना यावर्षातील महिने असे जात असल्यामुळे काय करावे, कसे करावे असा प्रश्‍न पर्यटकांना भेडसावत आहे.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये पावसाळा ऋतू आवडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. यात निसर्गप्रेमींची संख्या ही मोठी पाहायला मिळते. पावसात मनमुराद भिजायचे, भटकायचे आणि निसर्गाच्या कुशीत जाऊन मोकळा श्‍वास घ्यायचा. नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आणि मनाला भूलवणारे हे दिवस असे रिकामेच गेले आहेत. नैसर्गिक सौंदर्यांची देणगी लाभलेला महाराष्ट्र संपन्न ऐतिहासिक वारसा असल्यामुळे पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. इथे असलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, भरगच्च असलेले डोंगर, दरी, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला आनंद देवून जातात.

पावसाळ्यात येणाऱ्या रानफुलांनी फुलणारं जून महिन्यातील निसर्ग हे मनाला समाधान देवून जातं. परंतु यावर्षी या सा-या गोष्टींचा आनंद अनेकांना घेताच आला नाही. दरवर्षी जून महिन्याची चाहूल लागली की अनेकांची जोरदार तयारी सुरु असते. जून महिना हा हलक्या गारवांनी बहरलेला असतो. त्यात अनेक नवनवीन नियोजन, पावसाबरोबर मुलांच्या शाळेच्या वस्तूंची खरेदीची लगबगही सुरू झालेली असते.

यावेळी या विषयावर बोलताना ट्रेकर्स सूरज यादव म्हणाले की, आम्ही दरवर्षी मे-जून महिन्यात ट्रेकिंगला जाण्यासाठी पाच-सहा महिन्यापासूनच नियोजन करण्यास सुरुवात करतो. यावर्षीही तसेच नियोजन केले होते. परंतु करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन त्यामुळे आम्हाला यावर्षी कुठेही जाता आले नाही. गेल्या ३५ वर्षापासून आमचं पहिल्यांदा यावर्षीबाहेर फिरायला जाने बंद झाले आहे. यामुळे मनात थोडीशी खंत जाणवत आहे. परंतु आपले आरोग्य व्यवस्थित राहावे तसेच कोणालाही त्रास होवू नये याचा विचार करुन शांत बसलो आहे. यावर्षी ट्रेकिंगला जाता येत नाही याचं वाईट वाटत आहे. परंतु स्वत:ची समजूत काढली आणि घरातच शांत बसलो आहोत.


याबाबत शैलेश भिडे म्हणाले, मी २५ वर्षापासून मे- जूनमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी जातो. आमचा ट्रेकर्सचा मोठा ग्रुप आहे. आम्हाला या दिवसात सर्वत्र फिरण्याची खूप आवड आहे. दरवर्षी नवनवीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरुन सर्वत्र ठिकाणाची माहिती समजेल. सर्वजण मिळून कुठे आणि कसं जायचे याचे नियोजन करुन ठरवतो. परंतु यावर्षी करोनामुळे आमचे केलेले नियोजन सर्व रद्द करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com