Maharashtra Health: राज्यात एक डास तासाला देतोय २ जणांना डेंग्यू

उपशीर्षक: महाराष्ट्रात डेंगीचा धोका वाढला; प्रति तास २ रुग्णांची नोंद
dengue infestation
dengue infestation eSakal

Maharashtra Health: महाराष्‍ट्रात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. डेंगीच्या बाबतीत महाराष्‍ट्र देशात तिसऱ्या स्थानी आहे. १ जानेवारी ते ३० नोव्‍हेंबरपर्यंत राज्यात १७ हजार ५३१ रुग्ण आढळले असून देशभरात २ लाख ३४ हजार ४२७ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३३ हजार ०७५ रुग्ण आढळले असून त्यानंतर बिहारमध्ये १९ हजार ६७२ जणांना डेंगीची लागण झाली आहे.

dengue infestation
Maharashtra Free Health Treatment : राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना मिळणार मोफत उपचार

मुंबईसह राज्यातील लोकांच्या आरोग्यावर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशभरातील रुग्णांच्या तुलनेत सात टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबईत ४ हजार ३०० रुग्ण आढळून आले आहेत.

रिपोर्टिंग युनिटमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यावेळीही अनेकांना डासांमुळे होणाऱ्या आजारांची लागण झाली आहे, असे पालिका आरोग्य विभागातील सूत्रांनी माहिती दिली.

dengue infestation
Health Care News: या पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी, जाणून घ्या

आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू

राज्यात डेंगीमुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ७४ , केरळमध्ये ५१ आणि उत्तर प्रदेशात २८ मृत्यू झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चार वर्षांतील सर्वाधिक प्रकरणे

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात या वर्षी सर्वाधिक रुग्ण आढळले असल्‍याची माहिती आरोग्‍य विभागाने दिली आहे.

२०२० मध्ये ३ हजार३५६

२०२१ मध्ये १२ हजार ७२०

२०२२ मध्ये ८ हजार ५७८

२०२३ मध्ये १७ हजार ५४१

dengue infestation
Mens Health : पुरुषांना देखील रजोनिवृत्तीचा त्रास होतो, त्याची लक्षणे काय असतात?

काय काळजी घ्याल

- डेंग्यू, मलेरियाच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे विशिष्‍ट कालावधीत पाणी बदलत राहा.

- पाणी झाकून ठेवा

- आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

डेंगीची लक्षणे

ताप, डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी, त्वचेवर पुरळ, सांधे व स्नायू दुखणे, प्लेटलेट्स कमी होणे.

dengue infestation
Health Care News : रोज पिझ्झा खाल्ल्याने होऊ शकतो तोंडाचा अन् घशाचा कॅन्सर? संशोधनातून झाला धक्कादायक खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com